जून 2026

भाषान्तरघर     Posted: January 1, 2025

 मराठी अनुवादः – वसुधा सहस्रबुद्धे

  लताला या घरात येऊन काही दिवसच झाले होते. ती सुंदर तर होतीच परंतु तिच्या सुशील आणि मृदुभाषी स्वभावामुळे तिने घरातील सगळ्यांची मनं जिंकली होती. लग्नाचे परंपरेनुसार सगळे विधी पूर्ण झाल्यावर तिने आपलं सामान आपल्या खोलीतील कपाटात व्यवस्थित ठेवलं. तिची सासू मीरा तिला या नवीन घरातील वातावरणाशी समरस व्हायला मदत करीत होती. 

काही दिवसात मीराच्या लक्षात आलं की लताचा स्वभाव संकोची सुद्धा आहे. नवीन लग्न झालेल्या नव्या नवरीला नवीन घरात संकोच वाटणं स्वाभाविक होतं . पुढच्या दोन आठवड्यात लताने आपलं सगळं सामान आणि कपडे जागच्या जागी व्यवस्थित लावले.काही दिवसांनी मीराने पाहिलं की खालच्या स्टोअर रुम मध्ये लताच्या रिकाम्या सुटकेसच्या बाजूला ब्राऊन पेपरमध्ये गुंडाळलेलं एक पाकीट होतं . काही दिवस असेच गेले. मीराला वाटलं लताला जेव्हा गरज असेल तेव्हा ती ते पाकीट उघडील .परंतु ते पाकीट तसेच पडून राहिलं . 

एक दिवस उत्सुकतेने मीराने लताला विचारलं, “ लता या पाकिटात काय आहे ग ? कदाचित तू आपल्या खोलीत घेऊन जायला विसरली असशील . बरेच दिवस झाले ते इथेच पडलं आहे. “

लता संकोचली आणि म्हणाली, “आई, या पाकिटात माझ्या आई – बाबांचा फोटो आहे. तो कुठे ठेवावा मला समजत नाहीये. “

मीरा प्रेमाने तिला म्हणाली ,” अग उघड तर ,बघू या कसा आहे फोटो ?”

लताने आनंदाने पाकीट उघडलं आणि फोटोकडे निरखून बघत तो फोटो सासूच्या हातात देताना म्हणाली , “ते दोघे काश्मीरला फिरायला गेले होते ना ,तेव्हा काढलेला फोटो आहे. “

त्या सुंदर जोडीकडे प्रेमाने बघत मीरा म्हणाली ,” अग किती सुंदर दिसत आहेत दोघे जण ! कुठे बरं ठेवू? 

अरे यांची जागा तर इथे आहे. “ आणि मीराने तो फोटो हॉलच्या कोपऱ्यातील टेबलावर व्यवस्थित ठेवला . 

५० वर्षांपूर्वी मीराने स्वतःबद्दल असाच विचार केला होता . परंतु तेव्हा तिला हिम्मत झाली नाही. आता हॉलच्या त्याच टेबलावर मीरा आणि तिच्या पतीच्या फोटो शेजारी लताच्या आई वडिलांचा फोटो प्रेमाने ठेवला होता.   

गतिविधियाँ

  • सम्पर्क:-

    सुकेश साहनी

    185,उत्सव,महानगर पार्ट–2
    बरेली–243122 (उ.प्र.)


    sahnisukesh@gmail.com

    रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´

    रचनाएँ भेजने के लिए ई-मेल-:-

    laghukatha89@gmail.com

    विशेष सूचना-:-

    पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

    केवल स्वीकृत रचनाओं की ही सूचना दी जाती है।

    -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine