जून 2026

भाषान्तरजन्मदिन/वाढदिवस     Posted: March 1, 2026

मराठी अनुवादः डॉ. वसुधा सहस्रबुद्धे

बहुतेक ती कामावरून घरी परत येत होती. दिवसभराची  दमणूक तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. बस मध्ये ती माझ्या समोरच्या सीटवर बसली होती। 

बसल्यापासून डुलक्या घेत होती। असेल तीस पस्तीस वर्षांची। बांधा आकर्षक असावा। परंतु आत्ता मात्र अगदी थकलेली ,उदास वाटत होती। एकदा मनात आलं ,विचारावं ! तुम्हाला बरं वाटत नाहीये का ?पण नाही विचारलं, हल्ली अनोळखी माणसाशी बोलणं धोक्याचं आहे। मग मी माझ्यातलं माणूसपण 

दाबून ठेवलं आणि प्रवास करीत राहिलो। तेवढ्यात तिचा फोन वाजला। तिने आदराने फोन उचलला आणि यस सर .. जी सर …आणखी एक संधी द्या ना , …मी डिल नक्की क्रॅक करते। असंच काही तरी बोलत होती. मी समजलो तिच्या बॉसचा फोन असावा।फोन ठेवताना ती दीनपणे गया वया करीत होती। आता ती डुलक्या घेत नव्हती । तिची झोप उडाली होती। सावधपणे इकडे तिकडे बघत ती फोनवर बोलू लागली। तेवढ्यात पुन्हा फोन वाजला । बहुतेक सावकार असावा। 

त्याच्याकडून तिने पैसे घेतले असावे। ती पुन्हा गया वया करू लागली… पुढच्या महिन्यात पगार झाल्यावर नक्की परत करते। समोरून मिळालेल्या धमकीचं भय तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं । ती थोडी अस्वस्थ झाली होती। आपल्या चारही बाजूला तिने निरखून पाहिलं। जणू शोध घेत होती, तिचं फोनवरचं बोलणं कोणी ऐकलं तर नसेल ना ? नंतर ती तशीच उदास बसली होती। थोड्या वेळाने पुन्हा फोन वाजला। यावेळी फोन वाजल्यावर तिचा चेहरा खुलला। बहुधा तिच्या मुलाचा फोन होता।

फोनवरून तिने त्याची प्रेमाने पापी घेतली आणि म्हणाली मी अर्ध्या तासात घरी पोचते। आल्यावर तुझ्या वाढदिवसाची सगळी तयारी करते। तोपर्यंत तू तुझ्या मित्रांना बोलावून ठेव। यावेळी बोलणं संपल्यावर तिची नजर माझ्याकडे वळली। आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर सहज स्मित उमटलं ।त्यानंतर ती तिच्या फोनमध्ये आणि मी माझ्या फोनमध्ये !

थोड्या वेळाने पुन्हा तिचा फोन वाजला, कदाचित तिच्या बॉसचा असावा। पुन्हा तसेच बोलणं, बहुधा तो कोणत्या तरी क्लायंटच्या मिटिंग बद्दल  बोलत असावा। ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत होती की आज तिच्या मुलाचा वाढदिवस आहे। बोलणं संपवता संपवता ती म्हणाली – ” ठीक आहे। मी माझा राजीनामा पाठवते।”

नंतर एक खोल श्वास घेऊन ,डोळे बंद करून ती सीटवर टेकून बसली। तिच्या हालचालीतून निराशा स्पष्ट दिसत होती। आपल्या मुलाशी बोलल्यावर  तिच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता। आता तो नाहीसा झाला होता। काही वेळ ती तशीच बसली होती आणि तिचा फोन वाजला। यावेळी मुलाच्या शाळेतून फोन होता। फी भरण्याच्या शेवटच्या तारखे बद्दल बोलणं चाललं होतं । बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर चीड चीड स्पष्ट दिसत होती। यावेळी फोन बंद केल्यावर ती खिडकीतून बाहेर दिसणारी घरं, झाडं बघू लागली। मग तिने मोबाइल उचलला आणि कोणता तरी मेसेज टाईप करून पाठवून दिला।

 एवढ्यात बस स्टॉप आला ।ती पटकन खाली उतरली आणि दुसऱ्या  बसच्या रांगेत उभी राहिली।मी बसमध्ये बसलो होतो। रांगेत उभ्या उभ्याच तिने पर्समधील आपल्या आरशात बघून आपले केस आणि चेहरा सावरला।बघता बघता  तिने स्वतःला एखाद्या प्रोफेशनलसारखं तयार केलं। माझी बस पुढे गेली। बसच्या खिडकीतून मी पाहिलं एका लहान मुलाच्या हातातून सुटलेला फुगा आकाशांत उंच उंच 

उडत होता।

गतिविधियाँ

  • सम्पर्क:-

    सुकेश साहनी

    185,उत्सव,महानगर पार्ट–2
    बरेली–243122 (उ.प्र.)


    sahnisukesh@gmail.com

    रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´

    रचनाएँ भेजने के लिए ई-मेल-:-

    laghukatha89@gmail.com

    विशेष सूचना-:-

    पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

    केवल स्वीकृत रचनाओं की ही सूचना दी जाती है।

    -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine