जून 2026

भाषान्तरपानी और प्यास/पाणी आणि तहान     Posted: June 1, 2025

अनुवाद : वसुधा सहस्रबुद्धे. 

जसबीर चावला

प्राचीन काळी पाणी आणि तहान एकमेकांसोबत राहायचे. अगदी छान हसत खेळत राहायचे।  एक दिवस काय झालं कोणत्या तरी कारणाने तहानेला गर्व झाला. म्हणाली ,”मीच तुला सांभाळते .माझ्याशिवाय राहू शकतेस? ” पाणी म्हणाले, ” हो, जसं अग्नीशिवाय राहू शकतो।” तहानेला भयंकर राग आला आणि ती तिथून निघून गेली. 

पाणी आजारी पडलं। दिवसें दिवस सुकायला लागलं . ढगाला त्याची स्थिती बघवेना. मग तहानेच्या  शोधात ढग देश विदेश फिरू लागला. काही ठिकाणी त्याला वाटलं हीच तहान आहे॥ पण नाही ते तर वाळवंट होतं .ढग अगदी निराश झाला।  पाण्याची स्थिती बघून त्याला रडू आवरेना।

वसुधा सहस्रबुद्धे

एक दिवस त्याला खरीखुरी तहान भेटली।ती पहिल्यासारखी राहिली नव्हती । बदलली होती। तलावासारखे तिचे खोल डोळे विरहामुळे काळे पडले होते। ढगाने तिला पाण्याचं दुःख सांगितलं; परंतु तहानेला ते ऐकून काहीच वाटलं नाही, “स्वतःला महान समजतो ! मी जगू शकते अशीच। मरू दे त्याला।”

ढगाला  दोघांची दया आली। खूप रडू आलं,”काय झालंय या दोघांना ! खोट्या अहंकाराने खाऊन टाकलं आहे!”

आता तहान महागड्या बाटल्यांमध्ये विकली जाते। पाणी इकडे तिकडे भटकत राहतं । कधी पूर बनून तर कधी डोंगर बनून. त्याला खरी तहान भेटलीच  नाही…. 

गतिविधियाँ

  • सम्पर्क:-

    सुकेश साहनी

    185,उत्सव,महानगर पार्ट–2
    बरेली–243122 (उ.प्र.)


    sahnisukesh@gmail.com

    रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´

    रचनाएँ भेजने के लिए ई-मेल-:-

    laghukatha89@gmail.com

    विशेष सूचना-:-

    पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

    केवल स्वीकृत रचनाओं की ही सूचना दी जाती है।

    -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine