जून 2026

भाषान्तरयात्रा और मंज़िल/ प्रवास आणि ध्येय     Posted: June 1, 2026

मराठी अनुवादः वसुधा सहस्रबुद्धे

रोज सकाळी नवे शूज घालून बाहेर पडत असे. मोबाईल मध्ये गुगल मॅप उघडत असे. गाडी स्टार्ट करून दररोज एक नवीन रस्ता शोधीत असे परंतु त्याच मॉल मध्ये पोहोचत असे. जिथे तीच दुकानं ,तीच माणसं आणि  तेच चेहरे

एक दिवस गाडी बंद पडली आणि त्याने चालत जायचा निर्णय घेतला.चालता चालता  रस्त्यात  एका झाडाखाली एक म्हातारा माणूस भेटला

म्हाताऱ्याने विचारलं ,” कुठे जातो आहेस ?”

”ध्येय प्राप्तीच्या शोधात।”

म्हातारा हसला ,” माझ्याजवळ बस . इथेच तुझी ध्येय प्राप्ती आहे।”

“इथे ,रस्त्याच्या कडेला ?”

“होय , कारण जोपर्यंत तू चालत राहशील ,तुझं उद्दिष्ट पुढे पुढे जात राहील.जेव्हा बसशील तेव्हा ते तुझ्याकडे पोचेल।”

त्या दिवसापासून तो  तिथेच , त्या झाडाखाली राहिलायेणारी जाणारी माणसं विचारीत ,” कसा चालला आहे तुझा प्रवास ?”

तो हसत हसत  सांगायचा , ” मी आजपर्यंतचा सर्वात दूरच प्रवास पूर्ण केला आहे – स्वतःपर्यंत पोहोचण्याचा।”

आणि एक दिवस तो म्हातारा माणूस नाहीसा झाला. परंतु तो माणूस मात्र अजूनही तिथेच  बसलेला आहे .त्या झाडाखाली ! 

तो पाहतो आहे ,माणसं  आपलं  उद्दिष्ट गाठण्यासाठी त्याच्या समोरून कशी  धावत धावत जात आहेत

-0-

गतिविधियाँ

  • सम्पर्क:-

    सुकेश साहनी

    185,उत्सव,महानगर पार्ट–2
    बरेली–243122 (उ.प्र.)


    sahnisukesh@gmail.com

    रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´

    रचनाएँ भेजने के लिए ई-मेल-:-

    laghukatha89@gmail.com

    विशेष सूचना-:-

    पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

    केवल स्वीकृत रचनाओं की ही सूचना दी जाती है।

    -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine