मूल हिंदी,लघुकथा :भूत मराठी अनुवाद : रात्रीचं भूत
मूल लेखिका : सीमा सिंह अनुवादक : डॉ.रश्मि नायर
रात्रीचं भूत
ती आपल्या लहान बहिणीला फार लाडाने झोपवत म्हणाली “मिट्ठू आई-बाबा देवाघरी गेले तर काय
झालं ? मी आहे न, तुझा सांभाळ करण्यासाठी, तु काळजी करु नको . ”
” आणि काकापण आहेत ना ताई “मिट्ठू आणखी समजुतदारपणा दाखवत म्हणाली. काकांच नांव ऐकताच तीच्या मुखमंडलावर अनेक रंग आले आणि गेले. ती म्हणाली ” काकांच्या खोलीमध्ये तू कधी जाऊ नको. ते रात्री भूत होतात.”
बाहेर कुणीतरी आल्याची तीला चाहुल लागली . तेव्हा उठत निमिषा कठोर स्वरात म्हणाली ,”मी येते, भूताची गोष्ट विसरु नको मिट्ठू ”
बराच वेळ झाला ,निमिषा अजून परत आली नाही ताईवरचं प्रेम भीतिवर शेवटी भारी पडलं. मिट्ठू हळु-हळु अलगत पावलांनी काकांच्या खोलीपर्यंत पोहचली .
“माझ्याबरोबर जे केलं ते मी सहन केलं पण माझ्या बहिणाला कुदृष्टिने पहाल तर तुमची खैर नाही .”
ऐकून मिट्ठू घबरली. काकांनी ताईला पण आज भूत बनवल. निवस्त्र आणि पूर्णनग्न .
-0-