दिसम्बर -2018

भाषान्तरकॅक्टस अणि मशरूमस्     Posted: January 2, 2017

(अनुवाद: प्रदीप मोघे)
ड्रायव्हरने अॅक्सीलेटरवर पाय दाबताच जीपची मागची चाक जागच्या जागी गरगरा फिरू लागली। खालून निघणारे वाळूचे फव्वारे बघून जीपच्या भोवताली जमलेले गावकरी मोठयाने हसले।
अजयच्या मनात गावकन्यांबद्दल वितृष्णा दाटून आली। कसे उर्मट लोक आहेत। फजिती बघून हसताहेत नुसते। जर हीच आठ दहा माणसे जीपला मागून हात लावतील तर क्षणातच जीप पुढे जाईल।
त्याचवेळी गर्दी दुर सारीत एक मुलगा घाई घाईने बाहेर निघाला। त्याच्या हातात दोन फुटाच्या लाकडाच्या फळया होत्या। त्याने मागच्या चाकाजवळ पालथे पडून चपळाईने दोन्ही फळया मागचया चाकाखाली अडकवल्या। या खेपेस ड्रायव्हरने प्रयत्न केल्याबरोबर एका झटक्यावतच जीप बाहेर निघाली। अजय त्या पोरग्याच्या त्वरित कार्य योजनेकडे कौतुकाने बघत होता। व त्या मुलाचे ‘‘मेकेनिकल माइंड’’ पाहून दंग झाला। लक्ष देऊन तो त्या पोराचे निरीक्षण करू लागला। शरीरावर एकमात्र अधोवस्त्र लंगोटी….वय चौदा वर्ष…..चपळ…चतूर..धारदार नाक, चमकदार डोळे काहीतरी विचारात गढलेला …‘‘कोणत्या वर्गात शिकतोस रे?’’अजयने त्याला विचारले। ‘‘शिक्षण सोडून दिलंय….वडिलांबरोबर शेतात काम करू लागलोय’’ तो उारला ‘‘असे कां?’’ अजय दुखावला। आपल्या देशांत कितीतरी बालप्रतिभा शिक्षणाअभावी फुकट जाते। ‘‘काय फायदा? शाळेच्या नावावर मास्तरांच्या घराची कामे कराचयी। मास्तरांच्या शेतात राबायचे। जर शाळेत जाऊनही सर्व करायचे तर आपल्याच घराते आणि आपल्या शेतात का काम करू नये?’’ त्याने मोठा आत्मविश्वासाने प्रतिप्रश्न केला।
‘‘चला साहेब….अजून बरेचं लांब जायचेय’’ मध्येच ड्रायव्हरने त्याची तंद्री भंग केली। अजयने नाकातोंडावर जमलेली धूळ पुसली व जवळच्या ळोकावंर एक नजर टाकली। आता त्या लोकांबल त्याच्या मनां तिरस्कार नव्हता–त्याला ते चेहरे दयनीय वाटले। त्यांच्या स्थितीबद्दल विचार करीत तो जीप मधे बसला। थोड पुढे गेल्यावर त्याने पुन्हा मागे वळून बघितळ। जीपच्या मागे–मागे उठणान्या धुळीच्या लोटामुळे त्याला काहीच दिसले नाही।

गतिविधियाँ

 • चर्चा में

  हरियाणा साहित्य-संगम में लघुकथा पर विचार -विमर्श( सुकेश साहनी और राम कुमार आत्रेय की भागीदारी ।)
  लघुकथा अनवरत-2017 का विश्व पुस्तक मेले में अयन प्रकाशन के स्टाल पर विमोचन।

 • सम्पर्क:-

  सुकेश साहनी

  185,उत्सव,महानगर पार्ट–2
  बरेली–243122 (उ.प्र.)


  sahnisukesh@gmail.com

  रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´
  chandanman2011@gmail.com

  रचनाएँ भेजने के लिए पता-:-

  laghukatha89@gmail.com

  विशेष सूचना-:-

  पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

  -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine