दिसम्बर -2018

भाषान्तरमाहित नाही .     Posted: May 2, 2017

[मूल हिंदी,लघुकथा :”कॉक्रोच”               मराठी अनुवाद : माहित नाही ;मूल लेखिका :भावना सक्सेना    ;    अनुवादक : डॉ.रश्मि नायर

सरकारी कार्यालयात एक साहेब, … आपल्या सरकारी फोनवर काही आवश्यक विषयावर चर्चा करत होता .

कुणीतरी दार ठोकाऊन आत येत म्हणाले” आम्ही आत येऊ शकतो कां?

(नजरेचा इशारा मिळताच दोघे कॅबीनमध्ये गेले )

फोनवर अजुन बोलण चालुच होतं…. “मी पण विचार करत होतो की,जयपूरमध्ये  घर घेऊया… इथलं आवास विकास उत्तम आहे.

“अरे,नाही रे बाबा… आम्ही इथं राहु शकत नाही . कोण रोज-रोज डोकेफोडी करेल.

(बोलणं अजून चालुच होत.)

“सर आम्ही बसु?”

“हुं… हाताने इशारा केला .”

वीस मिनिट फोनवर बोलल्यानंतर,अधिकारी म्हणाला “तुमचं काय काम?”

“सर आम्ही परवा तुमच्याकडे आलो होतो. ती “फाईल “परत आली कां? हे विचारायच  होतं.

तो एका हाताच्या बोटानी रिसिवरची बटन दाबत होता. चार पांच वेळा नंबर फिरवून झाल्यानंतर मानेत रिसिवर दाबून त्याने एक यादी काढली . आलेले खुश झाले . त्यांना वाटलं साहेब फाईलची माहिती  गोळा करण्याचा प्रयत्न करत  आहे.

रागाने रसिवर आपटत… “बघा किती झुरळं झाली माझ्या कॅबीनमध्ये, एडमिनमध्ये फोन लावतो कोणी उचलतच नाही .”

“ती फाईल ”

” नवीन,कॅबीन आहे, नवीन बिल्डिंग काय माहित ही झुरळं आलीत कुठुन ?”

“सर कृपा करुन त्या फाईलची माहिती ?

(………)

साहेब,  टेबलच्या बाजूला एका शेल्फवरची एक-एक फाईल काढत होते.

आगुंतक खुश झाले, साहेब  फाईल शोधण्याच्या प्रयत्नांत आहे.

 

एक फाईल काढून दहा मिनटं वाचल्यानंतर (आपटत ) कसे कसे मजकुर येतात या कार्यालयात …

“सर, आवश्यक नसतं तर तुम्हाला त्रास दिला नसता .”

“तेच तर मी म्हणतो, वारंवार साहेबांकडे जाणं  बरोबर नाही. तुमची फाईल पुढे पाठवली आहे . तुमच्या कडे पोचेल .”

“आत्ता कुठे असेल ती फाईल ?”

“आत्ता ? आत्ता तर तुम्ही निघा, इथे बसुन वेळ वाया घालवून काय फायदा ? फाईलवर सही झाल्यावर तुमच्याकडे पाठवतो .

आत जाऊन पन्नास मिनिटानंतर, लाज,राग आणि निराशेने  दोन चेहरे बाहर आले. हे ऐकुन माहित नाही  कुठुन येतात ही झुरळ ?”.

-0-

गतिविधियाँ

 • चर्चा में

  हरियाणा साहित्य-संगम में लघुकथा पर विचार -विमर्श( सुकेश साहनी और राम कुमार आत्रेय की भागीदारी ।)
  लघुकथा अनवरत-2017 का विश्व पुस्तक मेले में अयन प्रकाशन के स्टाल पर विमोचन।

 • सम्पर्क:-

  सुकेश साहनी

  185,उत्सव,महानगर पार्ट–2
  बरेली–243122 (उ.प्र.)


  sahnisukesh@gmail.com

  रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´
  chandanman2011@gmail.com

  रचनाएँ भेजने के लिए पता-:-

  laghukatha89@gmail.com

  विशेष सूचना-:-

  पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

  -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine