दिसम्बर -2018

भाषान्तरमजहब (विटांचा धर्म )     Posted: October 1, 2017

मूल लघुकथा : मजहब                मराठी  : विटांचा धर्म 

मूल हिन्दी :कृष्णा वर्मा               मराठी में अनुवाद : डॉ. रश्मि नायर

एवढा मुसळधार पाऊस की थांबायच नावच घेत नव्हतं, जस आकाशाला भोकच पडल. पहाता पहाता पावसाच्या धारानी साचलेल्या  पाण्याने पुराच रुप घेतल.  गांवात धावपळ सुरु झाली .कुठे जायच हेच सुचेनास झाल. गुरं-ढोरं वाहुन गेली. नशिबाने  काही बैलगाड्या शिल्लक होत्या .त्यात वयस्करांना , लहान मुलांना लादले आणि मागुन बायका आणि पुरुषांचा घोळका निघाला.  एका गावातुन दुज्या, दुज्यातून , तिज्या गावांत फिरुन लोक हैराण झाली. कुठेपण वस्ती करण्याची सोय नव्हती.  शेवटी सगळे हार मानुन शहराकडे निघाले .

गाव आणि शहराच्या सीमेवर एक एकर जमीन रिकामी दिसली आणि लांबुन कुठुनतरी काळपट धूर दिसला. कुटुंबियांना तिथेच बसवुन  सगळे भीत-भीत  गावचे पुरुषमंडळी भांबावून तिथे काय चाललय याचा शोध लावायला  त्या दिशेने निघाले. त्यांना काय माहित की , काही वर्षापुर्वीच इथे कितीतरी  नवीन कारखाने सुरु झाले आणि  विटांची भट्टीपण लागली होती आणि हा धूर त्या भट्टी आणि कारखान्यातुन निघत होता .

तिथे जवळच्या भट्टीचा  मालक बलराम म्हणाला  “अरे हे काय? तुम्ही सगळे इथे काय करता ? काम शोधत आहात कां ?

धनीराम  म्हणाला ” हो काही काम मिळु शकेल कां? ”

“हो वीटा बनवायच काम येतं का ?”

” शिकुन घेऊ.”

“बरं चला या .”

गावकरी मंडळी खुप आनंदी झाली . दोन वेळच्या भाकरीची सोय झाली . उरलेल जीवन कसं ही जगता येईल .

बलरामाने प्रत्येकाला आप-आपला धर्म विचारला , व म्हणाला त्याप्रमाणे त्यांना वेग-वेगळ्या ठिकाणी झोपड्या बांधून देऊ शकेल. उद्या  जात-पात आणि धर्माच्या नावाने कुणाशीही भांडण होता कमा नये .

त्यामधुन एक म्हणाला, ” विटांप्रमाणे कामगारांची पण जात नसते आणि धर्म नसतो.  वीट जिथे लावली जाते तिथलीच होऊन जाते. कामगारांसाठी दोन वेळची  भाकरीच त्याचा देव आहे.

-0-

गतिविधियाँ

 • चर्चा में

  हरियाणा साहित्य-संगम में लघुकथा पर विचार -विमर्श( सुकेश साहनी और राम कुमार आत्रेय की भागीदारी ।)
  लघुकथा अनवरत-2017 का विश्व पुस्तक मेले में अयन प्रकाशन के स्टाल पर विमोचन।

 • सम्पर्क:-

  सुकेश साहनी

  185,उत्सव,महानगर पार्ट–2
  बरेली–243122 (उ.प्र.)


  sahnisukesh@gmail.com

  रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´
  chandanman2011@gmail.com

  रचनाएँ भेजने के लिए पता-:-

  laghukatha89@gmail.com

  विशेष सूचना-:-

  पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

  -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine