दिसम्बर -2018

भाषान्तरफटी चुन्नी / फाटका पदर[मराठी]     Posted: April 1, 2018

[ मराठी अनुवाद :डॉ.रश्मि नायर]

सीमा फक्त चौदा वर्षाची होती।आपल्या अब्रुचा फाटका पदर आपल्या आसवांच्या धाग्याने आणि विवशतेच्या सुईने शिवत बसली होती ।कालच आत्याच्या घरातून परत आली।तिथे जाताना कौमार्याच पदर ओढुन गेली,पण येताना फाटका पदर घेऊन आली ।आत्याने खुप मानपान देऊन बोलऊन घेतलं।ती पुन्हा एकदा गरोदर राहिली होती।तिच्या प्रसुतिचे दिवस जवळ आले होते।तिला आधीच एक तीन वर्षाची गोड मुलगी होती।

सीमा, हसत-खेळत आत्याची सगळी कामं करत होती।तिचे काका पण खुप लाड करत होते। आधी वडिलांसारख वात्सल्यपुर्ण प्रेमाने ती फार आनंदी झाली।कधी-कधी तिला आश्चर्य वाटायचं। बाबा तर असं प्रेम करत नाही ।असं कुठेही हात लावत नाही।हळु-हळु तिच हसण हरवल। तिच्या भोळ्या मुखावर उदासीचा परदा पडला।

आत्याने विचारलं “काय झालं ? ब घ तर तुझे काका तुला किती मान देतात। जा जरा त्यांच्या बरोबर बाहेर फिरुन ये।‘’ पण सीमा कधी आत्याला पुरुषी प्रेमाबद्दल सांगु शकली नाही ।” कधी–कधी तिला वाटायच सगळ्यांना ओरडुन सांगाव ।पण क्षणात, आत्याच्या संसाराचा विचार ,तीला तसं काही करु दिलं नाही ।आत्याला दुसरी पण मुलगीच झाली म्हणुन सगळ्यांचे टोमणे ऐकावे लागत होते अन् , त्यात दोन मुलींच ओझं कोण वाहणार ? आईतर आत्याला पहायला पण तयार नाही ।या परिस्थितीत फाटक पदर आपल्याचं आसवांच्या धाग्याने आणि विवशतेच्या सुईने तिला शिवाव लागलं ।
-0-

गतिविधियाँ

 • चर्चा में

  हरियाणा साहित्य-संगम में लघुकथा पर विचार -विमर्श( सुकेश साहनी और राम कुमार आत्रेय की भागीदारी ।)
  लघुकथा अनवरत-2017 का विश्व पुस्तक मेले में अयन प्रकाशन के स्टाल पर विमोचन।

 • सम्पर्क:-

  सुकेश साहनी

  185,उत्सव,महानगर पार्ट–2
  बरेली–243122 (उ.प्र.)


  sahnisukesh@gmail.com

  रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´
  chandanman2011@gmail.com

  रचनाएँ भेजने के लिए पता-:-

  laghukatha89@gmail.com

  विशेष सूचना-:-

  पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

  -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine