दिसम्बर -2018

भाषान्तररॉबिनहुड     Posted: July 1, 2018

अनुवाद: प्रदीप मोघे

दृष्टिभेट होतांच, फिल्मी हीरो प्रमाणे मी आपली नजर खाली वळवली। उत्तराखल त्या सुंदर तरूणीने सिनेमानटी प्रमाणेच दोनदा आपले खांदे उडवले आणि मग ओठाचा चंबू करून डोळे मिचकावले। मला वाटीं मी उंच उडू न ढगंाबरोबर तरंगतोय…..फिल्म स्लो मोशन मधे पुढे सरकतेय….ती आणि मी…..एकमेकांच्या मिठीत येण्यासाठी धावतोय…..
             आताच ‘मॅटिनी शो’ सुटला होता….गर्दी सिनेमा हॉलच्या बाहेर निघत होती। ती माइयापेक्षा बरीच दूर होती। बघता-बघता ती बाहेरच्या गर्दीत हरवली।
        संध्याकाळच्या मस्त वातावरणात मी पान दु कानाच्या आरश्यासमोर उभे राहून केस नीटनेटके केले। कंगवा हातात घेऊन फिरवला। मग हात खिशात टाकले आणि शीळ घालीत ‘हजरत गंज’ कडे जाऊ लागलो। तेव्हाच माझे लक्ष बंगल्यावरच्या बाल्कनीत उभ्या असलेल्या दोन मुलींनी बेधले। त्या माइयाचकडे बघून हसत होत्या। क्षणार्धात मनात आले की या त्याच सिनेमा हॉल मधल्या भेटलेल्या तरूणी तर नव्हेत? मी बेफिकीरीने केसावरून हात फिरवला आणि बघितलेल्या सिनेमाच्या हिरोच्या लकबीने चालू लागलो। त्याचवेळी माझे लक्ष रस्त्याच्या मधोमध धडपडणान्या सायकल स्वाराकडे गेले। कोसळणान्या सायकलीपुढे चाकाजवळ एक दोन वर्षाचा लहानगा मुलगा उभा राहून जारानेे रडत होता। क्षणार्धातच मी त्याच्याजवळ पोहोचला। सायकलस्वार आपला गुडघाधरून कण्हत। मी त्याचाहात धरून त्याला वर खेचले आणि ताड-ताड दोन तीन त्याच्या थोबाडीत ठेवून दिल्या-‘अरे! ते मुलगा जर मेला असता तर?’ मी ओरडलो। तो वृद्ध सायकल स्वार गालावर हात ठेवून विस्फारलेल्या डोळयांनी माइयाकडे बघू लागला। खूप दूरवर पोचेपर्यत सुद्धा त्चाची पुन्हा सायकलवर बसायची हिम्मतच झाली नाही। मी मोठया थाटाने बाल्कनीतल्या पोरींकडे बघितले-‘त्या दोघी निष्चितच माइया या पराक्रमाने प्रभावित झाल्या असणार’ मी विचार केला। एव्हाना जवळपास बघे लोक गोळा झाले ‘त्या बिचान्याची काय चूक होती? त्याने स्वतःला इजा होण्याची पर्वा न करता त्या लहान मुलास वाचवले-त्याला एवढासा धक्काही बसू दिला नाही’ गर्दीतून कोणी म्हणाले। ते ऐकून मला तर झटकाच बसला। ‘ही आजकालची तरूण मुलं काय समजतात स्वतः ला कोण जाणे….वडील माणसाला….निर्दोष असनांता…चापट मारतांना जरादेखील लाज कशी वाटली नाही? मी त्याच्या जागेवर असतो तर या लेकाचा फिल्मी हीरोपणा मोडूनच काढला असता।’ हे आणि असेच इतर शेरे ऐकून माझं धाबं दणाणलं….मला वाटल माइयातला हीरो निघून कुठेतरी अदृष्य झालाय….आणि मी एक सामान्य….बेकार…मुलाच्या रूपात येथून नोकरीच्या शोधात वणवण फिरतोय, वाटेवर एकटाच वणवण भटकतोय, भरकटतोय।

गतिविधियाँ

 • चर्चा में

  हरियाणा साहित्य-संगम में लघुकथा पर विचार -विमर्श( सुकेश साहनी और राम कुमार आत्रेय की भागीदारी ।)
  लघुकथा अनवरत-2017 का विश्व पुस्तक मेले में अयन प्रकाशन के स्टाल पर विमोचन।

 • सम्पर्क:-

  सुकेश साहनी

  185,उत्सव,महानगर पार्ट–2
  बरेली–243122 (उ.प्र.)


  sahnisukesh@gmail.com

  रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´
  chandanman2011@gmail.com

  रचनाएँ भेजने के लिए पता-:-

  laghukatha89@gmail.com

  विशेष सूचना-:-

  पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

  -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine