जून 2026

भाषान्तरचिप     Posted: January 1, 2026

मराठी अनुवाद: वसुधा सहस्रबुद्धे

” चॅटिंग करता करता दोन तास झाले !’

” तुझ्याशी बोलताना मी दुसऱ्या जगात जाऊन पोहोचतो. असं वाटतं तुझी चिप बनवावी आणि डोक्यात बसवावी. इच्छा झाली की चिप ऑन 

आणि चॅट सुरु. “

“चिप बनवून बसवायला हरकत नाही पण आज स्टाफरूममध्ये माझ्याकडे जसं निरखून बघत होता ना तसं मात्र प्लिज बघू नका . माझ्या छातीत धडधडतं  !

” बाप रे ! इतक्या कठीण आयुष्यात इतका कोमल अनुभव! म्हणूनच तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस ! “

“आता फोन ठेवा “

” नाही , तू ठेव.”

” का ?’

” तुझ्यापासून दूर झाल्यावर असं वाटतं माझा जीव जाईल !आता असं तुकड्यातुकड्यात नाही ,मला तू पूर्ण हवी आहेस .”

“नाही! नाही ! हे फक्त प्लॅटोनिक प्रेम असेल ! अगदी पवित्र …. मैत्री वजा प्रेम !”

” इतकी जवळीक झाल्यावर असं दूर राहणं चांगलं आहे ?”

“हेच बरोबर आहे , तुझं लग्न झालं आहे.”

” नाही, बघ एक दिवस मला हवं तेच होईल. “

”  नाही ,तुझं लग्न झालं आहे.”

” मग काय झालं ? तू फक्त माझ्यासाठी आहेस “

” … आणि तू ?”

” …. “

” बोल ना !”

” काय बोलू , तुला तर सगळं माहिती आहे.’

” तू इतका वेळ चॅट करतोस ,तुझी पत्नी काही बोलत नाही ?”

” ती तर झोपली . “

” तिला आपल्याबद्दल सगळं सांगितलं आहेस ? “

” नाही तर ! कोणाला काही सांगायला आपल्यामध्ये काय आहे ? “

त्यानंतर कधी चॅट होऊ शकलं नाही. चिप करप्ट झाली होती . 

-0-

गतिविधियाँ

  • सम्पर्क:-

    सुकेश साहनी

    185,उत्सव,महानगर पार्ट–2
    बरेली–243122 (उ.प्र.)


    sahnisukesh@gmail.com

    रामेश्वर काम्बोज ´हिमांशु´

    रचनाएँ भेजने के लिए ई-मेल-:-

    laghukatha89@gmail.com

    विशेष सूचना-:-

    पूर्व अनुमति के बिना लघुकथा डॉट कॉंम की सामग्री का उपयोग नहीं किया जा सकता ।

    केवल स्वीकृत रचनाओं की ही सूचना दी जाती है।

    -सम्पादक द्वय

Design by TemplateWorld and brought to you by SmashingMagazine